लेमनी पराठा (Paratha With Lemon And Orange Juice)
लेमनी पराठा (Paratha With Lemon And Orange Juice)

लेमनी पराठा
साहित्य : 2 वाटी मैदा, 1 वाटी तांदूळ पीठ, 1 वाटी कच्ची किसलेली पपई, अर्धी वाटी संत्र्याचा रस, 2 चमचे लिंबू रस, 4 चमचे मिरची पेस्ट, 1 चमचा खवा, 1 वाटी पनीर व कोथिंबीर, मीठ.
कृती : मैदा, तांदूळ पीठ, मीठ एकत्र करून मळून घ्यावे. पपई, संत्र्याचा रस, पनीर, लिंबूरस, मिरची, खवा, कोथिंबीर, मीठ एकत्र करून लहान लहान गोळे करा. लहान पोळ्या लाटून त्यात हे सारण भरून पराठे लाटा. तव्यावर तूप सोडून खरपूस भाजून गरम गरम सर्व्ह करा.