पनीर टिक्का मसाला (Paneer Tikka Masala)

पनीर टिक्का मसाला (Paneer Tikka Masala)

साहित्यः पाव किलो पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे, १ कांदा बारीक चिरून, अर्धा वाटी टोमॅटो सॉस, ४ चमचे टिक्का मसाला (नसल्यास चिकन मसाला), पाव वाटी घट्ट दही, ४ चमचे आलं-लसूण पेस्ट, अर्धा वाटी पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून, २ चमचे लाल ठेचा, २ चमचे आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, २ चमचे बटर.
कृतीः टोमॅटो सॉस, दही, आमचूर पावडर आणि सर्व सुके मसाले एकत्र करून, मिश्रण चांगलं फेटा. पनीरला मीठ आणि आमचूर पावडर चोळा. नंतर हा मसाला लावून, वरून कोथिंबीर पसरवा. यामुळे मसाला पनीरला व्यवस्थित चिकटून राहिल. तासाभरासाठी मसाला लावलेले पनीरचे तुकडे झाकून बाजूला ठेवून द्या. तासाभराने पनीरचे तुकडे बटरवर वेगळे तळून घ्या. एका कढईत बटर तापवा. त्यात कांदा आणि ठेचा चांगला परतवा. नंतर पनीरचा उरलेला मसाला आणि आलं-लसूण पेस्ट त्यात घालून व्यवस्थित परतवा. सर्व्हिंग डिशमध्ये सर्वप्रथम पनीर लावा आणि त्यावर ग्रेव्ही पसरवा. पनीर टिक्का मसाला गरमागरम सर्व्ह करा.
पनीर टिक्का मसाला, Paneer Tikka Masala

लेमनी पराठा (Tasty Lemoni Paratha)