उपवासाचे पनीर रोल (Paneer Roll For Fasting)

उपवासाचे पनीर रोल (Paneer Roll For Fasting)

उपवासाचे पनीर रोल

साहित्य : 2 बटाटे उकडलेले, 2 कप पनीर स्मॅश करून, 1 हिरवी मिरची, अर्धा टीस्पून आलं, 1 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून सैंधव मीठ, 7-8 मनुका, 1 टीस्पून काळी मिरीपूड, 1 टीस्पून वेलची पूड, चिमूटभर सुका मेवा, 2 टीस्पून कोथिंबीर, 2 टीस्पून तूप.

कृती :
उकडलेले बटाटे आणि स्मॅश केलेलं पनीर एका बाऊलमध्ये एकत्र करा. त्यात चिरलेलं आलं आणि हिरवी मिरची घाला. ते एकत्र मिसळून घ्या. नंतर त्यात जिरे पूड, सैंधव, मनुका, मिरीपूड, वेलची पूड, सुका मेवा आणि चिरलेली कोथिंबीर घाला. सर्व एकत्र मळून त्याचा पीठासारखा घट्ट गोळा बनवा. आता त्या मिश्रणाचे लांबट आकाराचे रोल बनवा. एका पॅनमध्ये तूप लावून हे रोल त्यावर शॅलो फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग झाला की तयार पनीर रोल सर्व्ह करा.