पनीर पालकची भुर्जी (Paneer Palak Bhurji)

पनीर पालकची भुर्जी (Paneer Palak Bhurji)

पनीर पालकची भुर्जी

साहित्यः 200 ग्रॅम किसलेले पनीर, 100 ग्रॅम पालक, 150 ग्रॅम कांदा, 100 ग्रॅम टोमॅटो, 5 ग्रॅम बारीक चिरलेली हिरवी मिरची, 10 ग्रॅम आलं पेस्ट, मीठ चवीनुसार, 100 मि.ली. तेल, 5 ग्रॅम हळद, 5 ग्रॅम धणे पूड, 5 ग्रॅम जिरे.

कृतीः पालक, कांदा, टोमॅटो चिरून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून जिर्‍याची फोडणी द्या. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, पालक, हळद,
धणे पूड, मीठ व पनीर घालून शिजवा. पनीरच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.