पनीर कटलेट (Paneer Cutlette)

पनीर कटलेट (Paneer Cutlette)

पनीर कटलेट

साहित्य :  प्रत्येकी 1 वाटी जाडसर किसलेलं पनीर, कच्चं केळं आणि बटाटा, अर्धी वाटी साबुदाणा पीठ, 4 टीस्पून (काश्मिरी-संकेश्‍वरी मिरची, जिरं आणि आलं यांचं) लाल वाटण, 1 टीस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून आमचूर पूड, स्वादानुसार मीठ, काही पुदिन्याची पानं.

कृती :  पनीर, केळं आणि बटाट्याचा कीस एकत्र करा. त्यात लिंबाचा रस, मीठ, आमचूर पूड आणि लाल वाटण घालून मिश्रण एकजीव मळून घ्या. नंतर त्यात साबुदाण्याचं पीठ आणि पुदिन्याची पानं घालून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्या. या मिश्रणाचे लहान-लहान कटलेट तयार करून घ्या. गरम तव्यावर तेल सोडून त्यावर कटलेट शॅलो फ्राय करा. हे पनीर कटलेट दह्यासोबत सर्व्ह करा.