पंढरपुरी लाडू (Pandharpuri Laddu)

पंढरपुरी लाडू (Pandharpuri Laddu)

साहित्य : 2 वाटी पंढरपुरी डाळे (चिवड्यासाठी वापरतात ते), दीड वाटी पिठीसाखर, 8 चमचे तूप, स्वादानुसार वेलची पूड.
कृती : तूप चांगलं फेसून घ्या. डाळं मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या. त्यात पिठीसाखर आणि तूप घालून, सर्व मिश्रण एकत्रित पुन्हा चांगलं फेटा. शेवटी त्यात वेलची पूड एकजीव करून, मिश्रणाचे लहान-लहान लाडू वळा. हे लाडू आठवडाभर चांगले टिकतात.