पान स्मूदी आणि ब्लॅककरंट डिलाइट (Pan Smoothie A...

पान स्मूदी आणि ब्लॅककरंट डिलाइट (Pan Smoothie And Black Current Delight)

पान स्मूदी
साहित्य : 1 कप घट्ट दही, पाऊण कप साखर, चिमूटभर वेलची पूड, 1 टीस्पून बडीशेप, 3-4 खायची पानं, 1 टीस्पून गुलकंद, 2 टीस्पून पान इसेन्स, 3-4 बर्फाचे तुकडे.
कृती : बर्फ सोडून उर्वरित सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून स्मूद होईपर्यंत ब्लेंड करा. नंतर त्यात बर्फाचे तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.

 

ब्लॅककरंट डिलाइट
साहित्य : 1 कप बिया काढलेल्या करवंदांचा गर, 2 सफरचंद बिया काढून बारीक तुकडे केलेले, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून मध, स्वादानुसार काळी मिरी पूड, 1 कप पाणी, थोडे बर्फाचे तुकडे.
कृती : सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून चांगलं ब्लेंड करून घ्या आणि थंडगार सर्व्ह करा.