पालक पनीर (Palak Paneer)

पालक पनीर (Palak Paneer)

पालक पनीर

साहित्य : 5 कप पाणी, 1 जुडी पालक, 1 इंच आलं, 1 पाकळी लसूण, 3 हिरव्या मिरच्या, 3 टीस्पून तेल, 1 टीस्पून बटर, 11 पनीर क्यूब्स, 1 टीस्पून जिरं, 1 इंच दालचिनी, 4 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, 1 तमालपत्र, 2 टीस्पून कसुरी मेथी, अर्धा कांदा चिरलेला, अर्धा टोमॅटो चिरून, पाव कप पाणी, पाऊण टीस्पून मीठ, पाव टीस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून मलई किंवा क्रीम.

कृती : पालक पाण्यात उकळवून घ्या. त्यात आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून पाणी न घालता त्याची पेस्ट बनवा. कढईमध्ये तेल व बटर घाला आणि त्यावर पनीरचे तुकडे चांगले खरपूस भाजून घेऊन बाजूला काढून ठेवा. नंतर त्याच पॅनमध्ये सर्व सुके मसाले चांगले परतवून घ्या. त्यात आधी चिरलेला कांदा घाला. नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजू द्या. मग त्यात पालकची पेस्ट, पाव कप पाणी आणि मीठ घाला. नंतर त्यात भाजलेले पनीरचे क्यूब्स घाला. चांगलं ढवळा. उकळी येऊ द्या. मसाला पनीरमध्ये एकजीव झाला पाहिजे. नंतर गॅस बंद करून त्यात गरम मसाला, कसुरी मेथी आणि क्रीम घाला. चांगलं एकत्र करून गरमगरम वाढा.