पान पनीर बाइट्स (Paan Paneer Bytes)

पान पनीर बाइट्स (Paan Paneer Bytes)

पान पनीर बाइट्स

साहित्य : 5 ते 6 विड्याची खाण्याची पानं, अर्धा कप बारीक किसलेलं ताजं पनीर, 2 टेबलस्पून पिठीसाखर, 3 टेबलस्पून खोबर्‍याचा कीस, 2 टेबलस्पून मँगो जॅम, 1 टीस्पून वेलची पावडर

कृती :
प्रथम विड्याची पानं स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. त्याचे देठ काढून टाका. नंतर एका भांड्यात पनीर, पिठीसाखर, खोबर्‍याचा कीस आणि वेलची पूड आणि मँगो जॅम एकत्र करून घ्या. हे मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे. नंतर एक पान घेऊन पानाच्या एका भागावर पनीरचं मिश्रण घाला. नंतर पानांचे रोल बनवा. हे रोल दहा मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. नंतर पान पनीर बाइट्स बाहेर काढून त्याचे बारीक काप करा. एका पानाचे दोन काप होतील. मग पान पनीर बाइट्स सर्व्ह करा.

टीप :
पानं रोल करताना हळूच करा नाहीतर पानं मोडतील. तसेच रोल होण्यासाठी ते फ्रिजमध्ये जाणेही महत्त्वाचे असते. ही अगदी दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे.