संत्र्याचं सरबत (Orange Sarbat)

संत्र्याचं सरबत (Orange Sarbat)

संत्र्याचं सरबत

साहित्य : अर्धा लीटर आंबट-गोड संत्र्याचा ताजा रस, अर्धा किलो साखर, 2 थेंब नारिंगी रंग, 1 ते दीड टीस्पून संत्र्याचा इसेन्स, अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड, अर्धा चमचा पोटॅशियम
मेटाबाय सल्फेट.

कृती : साखरेत अर्धा लीटर पाणी घालून उकळवा. साखर विरघळल्यानंतर त्यात सायट्रिक अ‍ॅसिड घालून साखरेवर आलेली मळी काढून टाका. आता दोन तारी पाक बनवून घ्या. पाक थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात संत्र्याचा रस, इसेन्स आणि रंग मिसळून हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. थोड्या पाण्यात पोटॅशियम मेटाबाय सल्फेटचा घोळ बनवून संत्र्याचा रसात वरून घाला.
लाभ : एक मोठा ग्लास हा संत्र्याचा रस घेतल्यास क जीवनसत्त्वाची पूर्ण दिवसाची गरज भागू शकते. संत्री रक्त शुद्ध करणारी, भूक वाढवणारी, पित्तनाशक आणि वातनाशक असतात.
या सरबताच्या सेवनाने रक्तातील अतिरिक्त आम्लता कमी होऊन, थकवा जाणवत नाही. विषमज्वर आणि क्षयरोगात संत्र्याचं सरबत दिल्यास शरीरातील विजातीय द्रव्यं मूत्रावाटे निघून जातात. रोग्याला उत्साह आणि तरतरी वाटते. 100 ग्रॅम संत्र्यात 70 मिलिग्रॅम क जीवनसत्त्वं असतं. त्या व्यतिरिक्त त्यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, अ आणि ब जीवनसत्त्वंही असतं.