ओनियन पनीर पराठा (Onion Paneer Paratha)

ओनियन पनीर पराठा (Onion Paneer Paratha)

ओनियन पनीर पराठा

साहित्यः १ कप पनीर, २ कांदे, १ टीस्पून ओवा, ४ हिरव्यामिरच्या, १ टीस्पून लाल मिरची पावडर, २ कप कणीक मळून घ्या, तूप आणि मीठ आवश्कतेनुसार.

कृतीः आधी पनीर किसून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ओवा, लाल मिरची पावडर एकत्र मिसळा. आता कणकेचा एक गोळा घ्या.  त्यात पनीर व कांद्याचे मिश्रण घालून गोळा बंद करा. हा गोळा पोळी प्रमाणे लाटून घ्या. पॅनवर तूप घालून दोन्ही बाजूने पराठा खरपूस शेकून घ्या. गरमगरम पराठा सॉस सोबत सर्व्ह करा.