ओनियन पनीर पराठा (Onion Paneer Paratha)

ओनियन पनीर पराठा (Onion Paneer Paratha)

ओनियन पनीर पराठा

साहित्य : 1 कप पनीर, 2 कांदे, 1 टीस्पून ओवा, 4 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 कप कणीक मळून घ्या, तूप आणि मीठ आवश्यकतेनुसार.

कृती : आधी पनीर किसून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, ओवा, लाल मिरची पावडर एकत्र मिसळा. आता कणकेचा एक गोळा घ्या. त्यात पनीर व कांद्याचे मिश्रण घालून गोळा बंद करा. हा गोळा पोळीप्रमाणे लाटून घ्या. पॅनवर तूप घालून दोन्ही बाजूने पराठा खरपूस शेकून घ्या. गरमगरम पराठा सॉससोबत सर्व्ह करा.