कांद्याची कचोरी (Onion Kachori Recipe)

कांद्याची कचोरी (Onion Kachori Recipe)

कांद्याची कचोरी

साहित्य : पिठासाठी : 2 कप मैदा, पाव कप वितळलेलं तूप, अर्धा टीस्पून मीठ.
सारणासाठी : 1 टीस्पून कलोंजी, 2 टीस्पून बडीशेप, 2 तमालपत्र, अर्धा टीस्पून बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 कप बारीक चिरलेला कांदा, 2 टेबलस्पून बेसन, 2 टीस्पून धणे पूड, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून गरम मसाला, 3 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
इतर : तळण्यासाठी तेल.

कृती : मैदा, तूप व मीठ एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळून साधारण मऊ कणीक मळून घ्या. हा कणकेचा गोळा पाच-सात मिनिटांसाठी झाकून ठेवा. नंतर कणकेचे 12 समान भाग करून, ओल्या सुती कापडात बांधून ठेवा सारण तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात कलोंजी, बडीशेप, तमालपत्र आणि हिरव्या मिरच्या घालून थोडा वेळ परतवा. नंतर त्यात कांदा घालून सौम्य तपकिरी रंग येईपर्यंत परतवा. आता त्यात बेसन, धणे पूड, मिरची पूड, गरम मसाला आणि मीठ मिसळून दोन-तीन मिनिटं परतवा. नंतर आचेवरून खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालून एकजीव करा. आता मिश्रणातून तमालपत्र बाहेर काढा आणि ते पूर्णतः थंड होऊ द्या. या मिश्रणाचेही 12 समान भाग करा आणि बाजूला ठेवून द्या. आता कचोरी तयार करण्यासाठी, पिठाच्या प्रत्येक गोळ्याच्या लहान पुर्‍या लाटा. त्यावर सारण ठेवून, पुरी सर्व बाजूने वर उचलून बंद करा. या गोळ्याची पुन्हा लहान पुरी (साधारण अडीच इंच व्यासाची) लाटा. पुरी लाटताना सारण बाहेर येणार नाही, याची दक्षता घ्या. कढईमध्ये तेल गरम करा. मंद आचेवर गरम तेलात तयार केलेली कचोरी अलगद सोडा आणि सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्या. कचोरी पुरीप्रमाणे दोन्ही बाजूने फुगायला हवी. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम कांद्याची कचोरी चिंचेच्या आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.