नट्स अँड चिप्स ब्राउनी (Nuts And Chips Browney)

नट्स अँड चिप्स ब्राउनी (Nuts And Chips Browney)

नट्स अँड चिप्स ब्राउनीसाहित्य :
अर्धा टिन कंडेंस्ड मिल्क, 1 कप मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून सोडा बाय कार्बोनेट, 2 टेबलस्पून बटर, 2 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 100 मिलिलीटर एरिएटेड वॉटर.

टॉपिंगसाठी :
पाव कप काजू व अक्रोडचे बारीक तुकडे, 2 टेबलस्पून चॉकलेट चिप्स.

कृती :
ओव्हन 250 डिग्री सेल्सियसवर 10 मिनिटं प्रीहिट करून घ्या. एका वाडग्यात सर्व साहित्य घेऊन दोन मिनिटं चांगलं फेटून घ्या. एका आठ बाय दहाच्या ट्रेमध्ये बटरचा हात फिरवून त्यावर मैदा भुरभुरा. नंतर जास्तीचा मैदा झटकून टाका. आता या ट्रेमध्ये मैद्याचं मिश्रण पसरवून सारखं करा. त्यावर काजू-अक्रोडाचे तुकडे आणि चॉकलेट चिप्स पसरवा. प्रीहिटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सियसवर 15 मिनिटं बेक करा. ओव्हनमधून बाहेर काढून थंड होऊ द्या. नंतर आवडीच्या आकारात कापून सर्व्ह करा.