दडपे पोहे (Nutritious Breakfast : Dadpe pohe)

दडपे पोहे (Nutritious Breakfast : Dadpe pohe)

साहित्य : 2 कप पातळ पोहे, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 2 टेबलस्पून ओलं खोबरं, 1 टीस्पून साखर, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टेबलस्पून बारीक शेव, 1 टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, पाव टीस्पून हिंग, 8-10 कढीपत्त्याची पानं, 2 टेबलस्पून शेंगदाणे, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, अर्धा टेबलस्पून तेल.
कृती : पोहे कोरडे भाजून घ्या. आता एका वाडग्यात हे पोहे घेऊन, त्यात कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं, साखर, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून, 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवा.  आता फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंगाची फोडणी करा. मोहरी तडतडली की, त्यात कढीपत्ते घालून परतवा. नंतर त्यात हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालून व्यवस्थित भाजून घ्या. ही फोडणी पोह्याच्या मिश्रणावर घालून, व्यवस्थित एकत्र करा. आता हे दडपे पोहे सर्व्हिंग डिशमध्ये घालून, त्यावर थोडा कांदा, टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर आणि शेव घालून सजवा आणि सर्व्ह करा.
टीप : त्यात डाळिंबंही घालता येतील.

दडपे पोहे, Nutritious Breakfast,  Dadpe pohe

चीझच्या 2 वेगळ्या पाककृती (2 Different Cheese Recipes)