नूडल्स स्प्रिंग रोल (Noodles Spring Roll)

नूडल्स स्प्रिंग रोल (Noodles Spring Roll)

साहित्य : आवरणासाठी : 1 कप मैदा, 2 टीस्पून तेल, पाव टीस्पून मीठ.
सारणासाठी : 1 कप उकडलेले नूडल्स, पाव कप पनीर, अर्धा कप बारीक चिरलेली कोबी, एक तृतीयांश कप मटार, पाव कप बारीक चिरलेली सिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा टीस्पून आल्याची पेस्ट, 1 टीस्पून
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, 1 टीस्पून सोया सॉस, पाव टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल, थोडं मैदा-पाण्याचं दाट मिश्रण.
कृती : मैद्यात तेल आणि मीठ मिसळून आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला आणि कणीक मळून घ्या. हे कणीक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा. आता कढईत तेल गरम करून त्यात आल्याची पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतवा. नंतर त्यात मटार, सिमला मिरची आणि कोबी घालून दोन मिनिटं परतवा. आता उर्वरित सर्व साहित्य घालून थोडा वेळ परतवा. मैद्याच्या कणकेच्या पातळ पोळ्या लाटून, गरम तव्यावर दोन्ही बाजूने साधारण शेकून घ्या. आता या पोळ्यांच्या मध्यभागी उभट सारण पसरवून गुंडाळी तयार करा. या गुंडाळीच्या दोन्ही कडा मैद्याच्या मिश्रणाने व्यवस्थित बंद करा. गरम तेलात हे रोल्स सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तुम्ही हे रोल्स थोड्या तेलात शॅलो फ्रायही करू शकता. गरमागरम नूडल्स स्प्रिंग रोल चटणी आणि सॉससोबत सर्व्ह करा.