नूडल्स पकोडा (Noodles Pakoda)

नूडल्स पकोडा (Noodles Pakoda)

साहित्य : 200 ग्रॅम हाका नूडल्स, 1 गाजर बारीक चिरलेली, 1 सिमला मिरची बारीक चिरलेली, अर्धा कप बारीक चिरलेली कोबी, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 कांदा बारीक चिरलेला, अर्धा कप बेसन, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : नूडल्स उकडून घ्या. त्यात तेल सोडून उर्वरित सर्व साहित्य मिसळून चांगलं एकजीव करून घ्या. गरम तेलात या मिश्रणाची भजी तळून घ्या. गरमागरम नूडल्स पकोडा शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.