नूडल्स मोमोज (Noodle Momos)

नूडल्स मोमोज (Noodle Momos)

साहित्य आवरणासाठी : 1 कप मैदा, 2 टीस्पून तेल, स्वादानुसार मीठ, ट्रेमध्ये ठेवण्यासाठी कोबीची पानं.
सारणासाठी : 1 कप किसलेला कोबी, 1 कप किसलेला गाजर, 1 कप बारीक चिरलेला कांदा, 1 पाकीट इंस्टंट नूडल्स, 2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 टेबलस्पून व्हिनेगर, 1 टेबलस्पून चिली सॉस, 2 टीस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : मैद्यामध्ये तेल आणि मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि कणीक मळून घ्या. हे कणीक झाकून बाजूला ठेवून द्या. कढईत तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा घालून परतवा. नंतर त्यात कोबी आणि गाजर घालून मोठ्या आचेवर परतवा. त्यात थोडं पाणी घालून उकळवत ठेवा. आता त्यात नूडल्स, मीठ, व्हिनेगर आणि चिली सॉस घालून पाणी आटेपर्यंत शिजवा. आता मैद्याच्या कणकेच्या लहान लहान पुर्‍या लाटून घ्या. या पुरीत सारण भरून मोमोजचा आकार द्या. सर्व मोमोज 15 मिनिटांकरिता मोदक पात्रात उकडून घ्या. गरमागरम नूडल्स मोमोज सॉससोबत सर्व्ह करा.