स्वीट डायमंड (New Recipe: Sweet Diamond)

स्वीट डायमंड (New Recipe: Sweet Diamond)

स्वीट डायमंड


साहित्य : 100 ग्रॅम वरीचं पीठ, 50 ग्रॅम राजगिर्‍याचं पीठ, 5 टेबलस्पून बारीक वाटलेली साखर, 1 टेबलस्पून ड्रायफ्रूटची पूड, 1 टीस्पून जायफळ पूड, 2 टेबलस्पून तूप, आवश्यकतेनुसार पाणी, तळण्यासाठी तेल.
कृती : वरीचं व राजगिर्‍याचं पीठ, साखर, ड्रायफ्रूट पूड आणि जायफळ पूड एका परातीमध्ये घेऊन त्यात कडकडीत तुपाचं मोहन घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी एकत्र करून कडक पीठ मळून घ्या. आता या पिठावर ओला कपडा घालून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्या. नंतर कणीक पुन्हा एकदा मळून, त्याची जाडसर चपाती लाटा. त्याच्या शंकरपाळ्या पाडून गरम तेलामध्ये सोनेरी रंगावर तळून घ्या.