अ‍ॅपल चमचम (New Recipe Of Apple)

अ‍ॅपल चमचम (New Recipe Of Apple)

अ‍ॅपल चमचम, Apple chamcham
साहित्य : 5 सफरचंद, 1 वाटी एकतारी साखरेचा गरम पाक, 4 चमचे दुधाचा मसाला, 200 ग्रॅम मावा, 100 ग्रॅम पनीर, 5 चमचे पिठीसाखर आणि थोडे सुक्यामेव्याचे तुकडे.
कृती : सफरचंदाच्या साली काढून, जाड व गोलाकार चकत्या करा. या चकत्या साखरेच्या गरम पाकात तासभर शिजवा आणि नंतर चाळणीवर निथळत ठेवा. मावा, पनीर, पिठीसाखर आणि दुधाचा मसाला एकत्र कालवा. या मिश्रणाचे लहान-लहान पेढे बनवा. एका डिशमध्ये पेपरकप किंवा बटर पेपर ठेवा. त्यावर सफरचंदाचे काप सजवून, त्यावर एक-एक पेढा दाबून ठेवा. अ‍ॅपल चमचम थंड करा आणि सर्व्ह करताना त्यावर सुक्या मेव्याचे काप पसरवा.