जॅकेट पोटॅटो (New Recipe : Jacket Potato)

जॅकेट पोटॅटो (New Recipe : Jacket Potato)

जॅकेट पोटॅटोसाहित्य :
3 मोठे बटाटे (सालासकट अर्धवट शिजलेले), 1 बारीक चिरलेली काकडी, अर्धा कप व्हाईट सॉस, पाव कप काजूचे तुकडे, स्वादानुसार सैंधव, पाव टीस्पून काळी मिरी पूड, थोडं कुस्करलेलं पनीर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : बटाट्याचे मधून दोन भाग करून घ्या. बटाट्याच्या तुकड्याचा मध्यभाग चमच्याने कोरून बटाट्याची वाटी तयार करून घ्या. व्हाईट सॉसमध्ये काकडी, काजू, मीठ आणि काळी मिरी पूड घालून एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण बटाट्याच्या वाटीमध्ये भरा. त्यावर पनीर घालून ओव्हनमध्ये 5 ते 7 मिनिटं बेक करा. वरून कोथिंबीर भुरभुरा आणि गरमागरम जॅकेट पोटॅटो सर्व्ह करा.

टीप : व्हाईट सॉस बनवण्यासाठी : अर्धा कप दुधामध्ये 2 टीस्पून आरारूट एकत्र करून मंद आचेवर थोडं शिजवून घ्या.