नवीन रेसिपी : तिरामिसू (New Cake Recipe For New...

नवीन रेसिपी : तिरामिसू (New Cake Recipe For New Year Celebrations)

नवीन रेसिपी : तिरामिसू

साहित्य : 1 स्पाँज केकचं पॅकेट, 4 टीस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, दीड कप दूध, 6 टीस्पून साखर, 1 टीस्पून इंस्टंट कॉफी पावडर (पाण्यात मिसळून कॉफी तयार करून घ्या), 4 टीस्पून क्रीम चीज, 3 टेबलस्पून फेटलेलं फ्रेश क्रीम.

कृती : थोड्या दुधात कस्टर्ड पावडर मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. पॅनमध्ये उर्वरित दूध, साखर आणि कस्टर्डचं मिश्रण घालून दाट होईपर्यंत शिजवा. नंतर आचेवरून उतरवून थंड होण्यासाठी ठेवून द्या. थंड झालेल्या कस्टर्डच्या मिश्रणात चीज क्रीम आणि फेटलेलं फ्रेश क्रीम एकत्र करा.
स्पाँज केक तीन स्लाइसेसमध्ये कापून घ्या. स्पाँज केकच्या प्रत्येक स्लाइसवर कॉफीचं मिश्रण पसरवा. आता सर्व्हिंग बाऊलमध्ये सर्वप्रथम केकची स्लाइस ठेवा. त्यावर कस्टर्डचं मिश्रण पसरवा. त्यावर पुन्हा केकची स्लाइस आणि कस्टर्डचं मिश्रण पसरवा. अशा प्रकारे तीन थर लावा. नंतर हे बाऊल दोन तासांकरिता फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. नंतर आवडीनुसार सजवून थंडगार सर्व्ह करा.