केळ्याची कढी गोळे (New Banana Kadhi Recipe)

केळ्याची कढी गोळे (New Banana Kadhi Recipe)

केळ्याची कढी गोळे

केळ्याची कढी गोळे, Banana Kadhi Recipe
साहित्य : 2 वाट्या दही, 1 वाटी नारळाचं दूध, 1 चमचा बेसन, थोडी चिंच, 5-6 लाल मिरच्या, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, 2 चमचे धणे-जिरं पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 4 कच्ची केळी, अर्धा वाटी ब्रेडक्रम्स, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, फोडणीचं साहित्य (जिरं, मोहरी, हळद, हिंग आणि कढीपत्ता), तूप.
कृती : हाताला तेल लावून कच्ची केळी तासून, जाडसर किसा. त्यात साखर, आलं-लसूण पेस्ट, मीठ,
2-3 हिरव्या मिरच्या, धणे-जिरं पावडर आणि गरम मसाला घालून एकत्र करा. गरजेनुसार त्यात ब्रेडक्रम्स एकत्र करून, मिश्रणाचे लहान-लहान गोळे करून घ्या.
हे गोळे तेलात तळून घ्या.
नारळाचं दूध आणि बसेन एकत्र घुसळा. त्यात वाटीभर पाणी घालून, गरम करत ठेवा. कढीला उकळी आल्यावर त्यात मीठ, साखर आणि चिंच घाला.
फोडणीच्या भांड्यात तूप गरम करून, त्यात मिरच्या, आलं, जिरं, मोहरी, हळद, हिंग आणि कढीपत्ता यांची फोडणी करा. ही फोडणी आणि केळ्याचे वडे कढीत घाला. कढीला एक उकळी आल्यावर, त्यावर झाकण ठेवून लगेच गॅस बंद करा.

बुंदी खीर (New Kheer Delite)