नाशिक चिवडा (Nashik Chivda)

नाशिक चिवडा (Nashik Chivda)

साहित्य : 1 किलो भाजके पोहे, अर्धा वाटी डाळ, अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी वाळवलेला कांदा, अर्धा वाटी आमसूल, अर्धा वाटी लसूण पाकळ्या, अर्धा वाटी खोबर्‍याचे काप, 2 चमचे धणे, 2 चमचे जिरेपूड, 2 चमचे लाल मिरची पूड, 2 चमचे हळद, 2 चमचे हिंग, 2 चमचे लवंगा आणि 2 चमचे दालचिनी पूड.
कृती : आमसूल आणि लसूण ठेचून घ्या. तेल गरम करून त्यात ते तळून घ्या. नंतर थंड करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. तेलामध्ये शेंगदाणे, डाळ, कांदा, खोबरं तळून बाजूला काढून ठेवा. वाटीभर तेलाची फोडणी करून त्यात सर्व मसाले आणि वाटण घाला. आच बंद करून, ही फोडणी कोमट होऊ द्या. नंतर एका पातेल्यात भाजके पोहे, तळलेले जिन्नस, फोडणी आणि मीठ सर्व अलगद व्यवस्थित एकत्र करा. चिवडा थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवा.