नागपंचमी स्पेशल: पायनॅपल शिरा (Nagpanchami Spec...

नागपंचमी स्पेशल: पायनॅपल शिरा (Nagpanchami Special: Pineapple Shira And Orange Sweet Rice)

पायनॅपल शिरा

Pineapple Shira

साहित्य : 2 वाट्या बारीक रवा, पाव वाटी साजूक तूप, 2 वाट्या अननसाचे काप, 2 चमचे दुधाचा मसाला, 1 वाटी साखर.
कृती : अर्ध तूप गरम करत ठेवा. त्यात रवा चांगला परतवून घ्या. तुपाचा वास येऊ लागल्यावर त्यात अननसाचे अर्धे काप घाला आणि परतवा. नंतर साखर घालून मिश्रण थोडे शिजू द्या. 2 वाट्या पाण्यात दुधाचा मसाला एकत्र करून, हे मिश्रण रव्यावर ओता आणि झाकण ठेवून रवा शिजू द्या. रवा शिजल्यावर त्या उरलेला अननस हाताने कुस्करून घाला आणि झाकण न ठेवता दोन वेळा परतवा. पायनॅपल शिरा गरमागरम किंवा थंडगार सर्व्ह करा.

ऑरेंज स्वीट राइस

ऑरेंज स्वीट राइस

साहित्य : 2 वाट्या बासमती तांदूळ, 1 वाटी साखर, अर्धी वाटी ओलं खोबरं, 4 संत्र्याचा गर, 5-6 काड्या केशर, पाव वाटी दूध, 1 चमचा लिंबूरस आणि मीठ, पाव वाटी तूप, अर्धी वाटी सुका मेवा.
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन दोन तास भिजत ठेवा. नंतर कुकरमध्ये तूप तापवून त्यावर सुका मेवा तळून घ्या. नंतर त्यात तांदूळ परतून त्यात साडेतीन वाटी पाणी घालून झाकण लावून एक शिटी काढा.
एका पातेल्यात थोडंसं तूप तापवा. त्यावर संत्र्याचा अर्धा गर व साखर घाला. साखर थोडीशी वितळायला लागली की त्यात दूध व केशर घाला. एकदा ढवळा व त्याला उकळी फुटल्यावर त्यात थंड झालेला भात, उरलेला संत्र्याचा गर, केशर व मीठ घाला. हलक्या हाताने ढवळा व ओलं खोबरं घालून गरम गरम सर्व्ह करा. हे पण वाचा: 

पोहे-बटाटा भजी (Monsoon Special: Poha-Potato Bhajiya)