नाचणी पुडिंग (Nachani Puding)

नाचणी पुडिंग (Nachani Puding)

नाचणी पुडिंग


साहित्यः 2 कप नाचणीचे पीठ, अर्धा लीटर दूध, 3-4 थेंब व्हॅनिला इसेन्स, 150 ग्रॅम साखर, 1 टीस्पून तूप.

कृतीः कढईत तूप गरम करून नाचणीचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या. त्यातच हळूहळू दूध घालत सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. साखर घाला. थंड झाल्यावर इसेन्स घाला.काचेच्या बाउलमध्ये काढून आवडत असल्यास सुका मेवा घाला. पूर्ण सेट झाल्यावर सर्व्ह करा.