नाचणी-मेथी पराठा (Nachani Methi Paratha)

नाचणी-मेथी पराठा (Nachani Methi Paratha)

नाचणी-मेथी पराठा

साहित्य : 1 कप नाचणीचं पीठ, पाव कप गव्हाचं पीठ, 1 कप बारीक चिरलेली मेथीची पानं, 1 टीस्पून ओवा, स्वादानुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची व मीठ,
2 टेबलस्पून तेल किंवा तूप.

कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. या पिठाचे पराठे तयार करून तेल किंवा तूप लावून शेकून
घ्या. गरमागरम नाचणी-मेथी पराठे लोणीसोबत सर्व्ह करा.

टीप : मेथीऐवजी पालकची पानं घालूनही नाचणी-पालक पराठा तयार करता येईल.