मशरूम मटार (Mushroom Peas)

मशरूम मटार (Mushroom Peas)

मशरूम मटार


साहित्य: प्रत्येकी 100 ग्रॅम उकडून घेतलेले मशरूम व मटार, 2 मोठे कांदे व 2 मोठे टोमॅटो पेस्टसाठी, 1 टीस्पून एव्हरेस्ट गरम मसाला, प्रत्येकी 30 ग्रॅम काजू व मगज, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हळद, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून ताजे क्रीम, 1 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून धणे पूड, मीठ चवीनुसार.

कृती: कांदा व टोमॅटो वेगवेगळे वाटून घ्या. काजू व मगज पाण्यात भिजवून, उकडून पेस्ट बनवून घ्या. कढईत तेल गरम करून जिरे, आलं-लसूण पेस्ट टाका. कांदा व टोमॅटोची पेस्ट टाकून परतून घ्या. काजू व मगज पेस्ट टाका. मीठ, हळद, काश्मिरी लाल मिरची पूड, धणे पूड, जिरे पूड व एव्हरेस्ट गरम मसाला टाकून परतून घ्या. उकडलेले मटार व मशरूम घालून 5-7 मिनिटे शिजवा. कापलेले मशरूम, मटार व ताज्या क्रीमने गार्निश करून सर्व्ह करा.