पोहे-बटाटा भजी (Monsoon Special: Poha-Potato Bh...
पोहे-बटाटा भजी (Monsoon Special: Poha-Potato Bhajiya)

By Shilpi Sharma in द्रौपदीची थाळी
पोहे-बटाटा भजी
साहित्य : सव्वा कप जाडे पोहे, अर्धा कप उकडून कुस्करलेले बटाटे, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 1 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून साखर, अर्धा टीस्पून जिरं, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : पोहे चाळणीवर ठेवून पाण्याने धुवा. 10 मिनिटं तसेच ठेवा, म्हणजे पोह्यातील पाणी पूर्णतः निथळून जाईल. आता पोहे एका मोठ्या वाडग्यात घेऊन त्यात तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य मिसळा. मिश्रण चांगलं एकजीव करून, त्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा. हे गोळे गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम पोहे-बटाटा भजी हिरवी चटणी आणि टोमॅटो केचअपसह सर्व्ह करा.