कॉर्न पोटॅटो चीज फ्रिटर्स आणि कॉर्न क्रोकेट्स (...

कॉर्न पोटॅटो चीज फ्रिटर्स आणि कॉर्न क्रोकेट्स (Monsoon Special : Corn Recipes)

कॉर्न पोटॅटो चीज फ्रिटर्स

साहित्य : 1 कप किसलेला बटाटा, अर्धा कप किसलेला कांदा, अर्धा कप उकडलेले स्वीट कॉर्न, 3 टेबलस्पून चिली सॉस, पाव कप गव्हाचं पीठ, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य एका मोठ्या वाडग्यात घेऊन चांगलं एकजीव करा. कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे अलगद सोडा. फ्रिटर्स कुरकुरीत आणि सोनेरी रंगाची होईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम कॉर्न पोटॅटो चीज फ्रिटर्स हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

 

कॉर्न क्रोकेट्स

साहित्य : 3 बटाटे उकडून कुस्करलेले, अर्धा कप उकडलेले मक्याचे दाणे, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा टीस्पून आल्याची पेस्ट, अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट, पाव कप ब्रेड क्रम्स, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : एका मोठ्या वाडग्यात ब्रेड क्रम्स आणि तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घेऊन चांगलं एकजीव मळून घ्या. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करा.
आता एका कढईत तेल गरम करा. बटाटा-मक्याचे गोळे ब्रेड क्रम्समध्ये घोळून गरम तेलात अलगद सोडा आणि सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम कॉर्न क्रोकेट्स हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.