चायनीज भजी (Monsoon Special : Chinese Bhajiya)

चायनीज भजी (Monsoon Special : Chinese Bhajiya)

चायनीज भजी


साहित्य : 2 कप किसलेला कोबी, पाव कप बारीक चिरलेला कांदा, 2 टेबलस्पून मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, 2 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या
(बारीक चिरलेल्या), स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य एका मोठ्या वाडग्यात घेऊन, चांगलं एकजीव करून घ्या. त्यात 4 टेबलस्पून पाणी मिसळून दाट मिश्रण तयार करा.
आता कढईत तेल गरम करत ठेवा. गरम तेलात थोडं-थोडं भज्याचं मिश्रण अलगद सोडा. मध्यम आकाराची भजी कुरकुरीत आणि सोनेरी रंगाची झाली की, तेलातून काढा. टिश्यू पेपरवर ठेवून जास्तीचं तेल निथळू द्या. गरमागरम चायनीज भजी शेजवान सॉससोबत सर्व्ह करा.