पावसाळी स्नॅक : पोहा भजी (Monsoon Snack : Poha ...

पावसाळी स्नॅक : पोहा भजी (Monsoon Snack : Poha Bhajiya)

पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. या मौसमात गरम-गरम चहासोबत गरमागरम स्नॅक खायला मिळाले तर मौसमाची खरी मजा येते. घरात बसल्याबसल्या पावसाची मजा घ्यायची आहे तर पोह्याची भजी करून बघाच. खायला जेवढी स्वादिष्ट तेवढीच बनवायला सोपी.

 

पोहा भजी

साहित्य : भजी बनवण्यासाठी :

१ कप पोहे (भिजवलेले)

प्रत्येकी अर्धा-अर्धा कप किसलेली दुधी आणि किसलेले गाजर, दही आणि पाणी

पाव कप मटार

१ टीस्पून आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट

१ टीस्पून साखर

पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर

५ टेबलस्पून बेसन, तळण्यासाठी तेल.

फोडणीचे साहित्य :

१ टीस्पून तेल आणि १ टीस्पून राई

२ टीस्पून हिंग, २ टीस्पून पांढरे तिळ

कृती :

एका बाऊलमध्ये भिजवलेले पोहे, दही आणि पाणी एकत्र करून २० ते २५ मिनिटं मिश्रण झाकून ठेवा. तळण्यासाठीचे तेल सोडून बाकी भजीचं सर्व साहित्य पोह्याच्या मिश्रणात एकत्र करा.

नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेलात राई, हिंग आणि सफेद तिळाची फोडणी करा.

पॅन आचेवरून उतरवून ही फोडणी पोह्याच्या मिश्रणामध्ये मिसळा.

आता कढईमध्ये तेल गरम करा.

पोह्याच्या मिश्रणाच्या भज्या तेलात सोडा आणि मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तयार पोहा भजी हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.