मोगर्‍याचं सरबत (Mogra Sarbat)

मोगर्‍याचं सरबत (Mogra Sarbat)

मोगर्‍याचं सरबत

साहित्य : अर्धा किलो मोगर्‍याच्या फुलांच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून सायट्रिक अ‍ॅसिड, अर्धा टेबलस्पून तुरटी, 2 किलो साखर, 5-6 वर्क.

कृती :
साखरेमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड आणि पाणी घालून, साखरेचा दोन तारी पाक तयार करून घ्या. मोगर्‍याच्या फुलांच्या पाकळ्या जाळीदार पिशवीत घालून, ती पिशवी गरम पाकात एक दिवस बुडवून ठेवा. नंतर ती पिशवी काढून चाळणीत निथळत ठेवा. चाळणीतून पाक झिरपला की, त्यात तुरटी फिरवून, मिश्रण गाळणीने गाळून घ्या. सरबत पातळ वाटल्यास, पुन्हा दोन तारी पाक होईस्तोवर उकळा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात वर्क भुरकून स्वच्छ हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. हे सरबत सुगंधित आणि शांतिदायक आहे.