मॉडर्न पोटॅटो रेसिपीज: पोटॅटो मफिन्स आणि पोटॅटो...

मॉडर्न पोटॅटो रेसिपीज: पोटॅटो मफिन्स आणि पोटॅटो लटके (Modern Potato Recipes: Potato Muffins and Potato Latake)

पोटॅटो मफिन्स

साहित्य : 3 कप उकडून कुस्करलेले बटाटे, 60 ग्रॅम मैदा, 60 ग्रॅम बटर, पाव कप दूध, 1 टीस्पून व्हिनेगर, 1 कप किसलेलं चीझ, 1 टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून जायफळ पूड, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, 2 अंडी फेटलेली.

कृती :
ओव्हन 180 डिग्री सेल्सियसवर प्रीहिट करत ठेवा. चीझ सोडून उर्वरित सर्व साहित्य एका वाडग्यामध्ये घेऊन बिटरच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घ्या. आता हे साहित्य ग्रीस केलेल्या मफिन्सच्या साच्यांमध्ये अर्धा भाग भरा. त्यावर किसलेलं चीझ भुरभुरा. हे साचे प्रीहिटेड ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सियसवर 20 ते 22 मिनिटं बेक करा. मफिन्स व्यवस्थित
बेक झाले की थोडा वेळ थंड होऊ द्या. नंतर साच्यातून काढून सर्व्ह करा.

पोटॅटो लटके

साहित्य : 2 बटाटे, अर्धा कप कांदा बारीक चिरलेला, 1 अंडं फेटलेलं, स्वादानुसार मीठ, पाऊण कप ऑलिव्ह ऑईल.

कृती :
बटाट्याची सालं तासून, किसून घ्या. बटाट्याचा कीस थंड पाण्यात पाच मिनिटं बुडवून ठेवा. नंतर त्यातील पाणी पूर्णतः निथळून घ्या. हा कीस आणि कांदा सुती कापडावर ठेवा. कापड गुंडाळून पिळा म्हणजे, बटाटा आणि कांद्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. आता एका वाडग्यामध्ये फेटलेलं अंडं, किसलेला बटाटा, कांदा आणि मीठ घेऊन मिश्रण चांगलं फेटून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल लावून त्यावर 1 टेबलस्पून अंडं-बटाट्याचं मिश्रण पसरवून घाला. मंद आचेवर सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजा. पाच मिनिटांनंतर परतून दुसरी बाजूही सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या. नंतर ते टिश्यू पेपरवर काढून घ्या. गरमागरम सर्व्ह करा.

टीप : बेक्ड पोटॅटो लटके बनवण्यासाठी, ते प्रीहिटेड ओव्हनमध्ये 200 डिग्री सेल्सियसवर अर्धा तास बेक करा.