मिक्स फ्रुट सरबत (Mix Fruit Sarbat)

मिक्स फ्रुट सरबत (Mix Fruit Sarbat)

मिक्स फ्रुट सरबत

साहित्य : 2 लिंबू, 2 मोसंबी, 2 संत्री, 1 मध्यम आकाराचा अननस, चवीनुसार साखर आणि मीठ.

कृती : लिंबू, संत्रं, अननस आणि मोसंबी यांची सालं काढून रस काढून घ्या. रसाच्या दीडपट साखर घेऊन, त्यात निमपट पाणी घाला आणि एकतारी पाक तयार करा. पाक थंड झाल्यानंतर त्यात फळांचा रस घाला आणि स्वच्छ बाटलीमध्ये भरून ठेवा. सरबत बनवण्यासाठी ः पाऊण ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे मिक्स फ्रुट सरबत आणि किंचित मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण गाळून सर्व्ह करा.