मिक्स डाळ वडा (Mix Daal Vada)

मिक्स डाळ वडा (Mix Daal Vada)

मिक्स डाळ वडा

साहित्य : 1 कप चणा डाळ (भिजवलेली), अर्धा कप चिरलेला कांदा, प्रत्येकी अर्धा-अर्धा टीस्पून हिंग आणि आल्याची पेस्ट, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद, थोडी चिरलेली कोथिंबीर, थोडा कढिपत्ता, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृती : डाळीचं पाणी निथळून ती मिक्सरमधून पाणी न घालता थोडी जाडसर वाटून घ्या. तेल सोडून बाकी सर्व साहित्य डाळीच्या वाटणात एकत्र करून त्याचे मध्यम आकाराचे वडे बनवा. कढईत तेल गरम करत ठेवा. मंद आचेवर गरम तेलामधून हे वडे सोनेरी रंग येईपर्यंंत तळा. तयार वडे खोबर्‍याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.