दूध बर्फी (Milk Burfi Recipe)

दूध बर्फी (Milk Burfi Recipe)

दूध बर्फी


साहित्य : 2 वाटी दुधाची पावडर, स्वादानुसार पिठीसाखर, अर्धा चमचा इनो, 1 चमचा वेलची पूड, थोड्या केशराच्या काड्या, सजावटीसाठी थोडे बदाम-पिस्त्याचे काप.
कृती : दुधाच्या पावडरमध्ये इनो, वेलची पूड आणि केशराच्या काड्या मिसळा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून ढोकळ्यासाठी पीठ भिजवतात, त्यापेक्षा थोडं घट्टसर पीठ भिजवा. ताटलीला तूप लावून, त्यावर हे मिश्रण घाला आणि सारखं करून घ्या. ढोकळ्याप्रमाणेच ते पाच-सात मिनिटं वाफेवर शिजवून घ्या. नंतर बर्फी थंड झाली की, त्यावर थोडी पिठीसाखर आणि बदाम-पिस्त्याचे काप पसरवा. नंतर त्याच्या वड्या पाडून घ्या.