मायक्रोवेव्ह कलाकंद (Microwave Kalakand)

मायक्रोवेव्ह कलाकंद (Microwave Kalakand)

मायक्रोवेव्ह कलाकंद


साहित्य : पाव कप दूध, एक तृतीयांश कप साखर, पाव किलो किसलेलं पनीर, 1 टीस्पून वेलची पूड, पाव कप दुधाची पूड, पाव टीस्पून जायफळ पूड, 2 टेबलस्पून मलई, सजावटीसाठी चांदीचा वर्ख आणि थोडे बदाम-पिस्त्याचे काप.

कृती : एका मायक्रोवेव्हच्या भांड्यामध्ये दूध आणि साखर एकजीव करून घ्या. हे मिश्रण तीन मिनिटांकरिता मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. नंतर ते मायक्रोवेव्हमधून बाहेर काढून
ढवळा आणि त्यात (सजावटीचं साहित्य सोडून) उर्वरित सर्व साहित्य मिसळा. हे मिश्रण पुन्हा सात मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. आता मायक्रोवेव्हमधून बाहेर काढून दोन-तीन मिनिटं असंच ठेवा. नंतर तुपाचा हात लावलेल्या थाळी किंवा ट्रेमध्ये पसरवून दोन-तीन मिनिटांकरिता सेट होऊ द्या. कलाकंदावर चांदीचा वर्ख आणि बदाम-पिस्त्याचे काप पसरवून
चौकोनी तुकडे करून घ्या.