मेथी थेपला (Methi Thepala)

मेथी थेपला (Methi Thepala)

मेथी थेपला

साहित्य : 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप नाचणीचं पीठ, पाव कप ओट्सचं पीठ, पाव कप किसलेला बीट, 1 कप बारीक चिरलेली पालकाची पानं, अर्धा कप कुस्करलेला पनीर, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर-पुदिन्याची पानं, 1 टीस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून आलं-हिरवी मिरचीची पेस्ट, 2 टीस्पून दही, 2 टीस्पून जिरे पूड, शेकण्यासाठी तेल.

कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य एकत्र करून, आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मऊसर मळून घ्या.
हे पीठ साधारण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा. नंतर पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या. पिठाचे पराठे लाटून गरम तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूला सोनेरी रंगावर शेकून घ्या. गरमागरम पराठ्यावर बटर घालून दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.