मेथीच्या मुठिया (Methi Muthiya)

मेथीच्या मुठिया (Methi Muthiya)

मेथीच्या मुठियासाहित्य :
3 वाटी बारीक चिरलेली मेथीची पानं, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन, 3 टीस्पून आलं-हिरवी मिरची वाटण, अडीच टीस्पून साखर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, चिमूटभर खायचा सोडा, 3 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :
मेथीच्या पानांमध्ये थोडं मीठ व्यवस्थित एकत्र करा आणि बाजूला ठेवून द्या. साधारण 5-7 मिनिटांनी मेथीच्या पानांना पाणी सुटेल. ते पाणी काढून घ्या. नंतर मेथीच्या पानांमध्ये गव्हाचं पीठ, बेसन, आलं-हिरवी मिरची वाटण, साखर, हळद, लाल मिरची पूड, सोडा आणि 3 टेबलस्पून तेल एकत्र करून मऊ पीठ मळा. आवश्यकता वाटल्यास मेथीमधील काढून ठेवलेलं पाणी, त्यात घाला. आता या पिठाच्या लहान-लहान मुठिया करून गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.