मेथी मलई मटार (Methi Malai With Peas)

मेथी मलई मटार (Methi Malai With Peas)

मेथी मलई मटार

साहित्यः 1 जुडी मेथी, 1 कप मटार, 160 ग्रॅम अमेरिकन कॉर्न, 2 मध्यम आकाराचे कांदे, आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ताजे क्रीम, अर्धा कप दही, चिमूटभर हळद, 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरे, अर्धा कप मावा, 1 कप ताजे क्रीम, तळण्यासाठी तेल, मीठ चवीनुसार.

कृतीः मेथी धुऊन कापून घ्या. यात 1 टीस्पून मीठ टाकून अर्धा तास बाजूला ठेवून द्या. पुन्हा एकदा धुऊन पाणी निथळून घ्या. मटार व कॉर्न उकडून घ्या. कांदा, लसूण व आलं किसून घ्या. दह्यात हळद, काश्मिरी लाल मिरची पूड व कुस्करलेला मावा मिक्स करून वेगळे ठेवा. पॅनमध्ये तेल गरम करून जिरे टाका. कांदा टाकून परतून घ्या. आलं-लसूण पेस्ट टाका. मेथी व हिरवी मिरची टाकून भाजी सुकी होईपर्यंत शिजवा. दह्याचे मिश्रण टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. उकडलेले कॉर्न व मटार टाका. 1 कप पाणी व चवीनुसार मीठ टाकून 10 मिनिटे शिजवा. ताजे क्रीम टाकून गरम-गरम सर्व्ह करा.