मेथी-ड्रायफ्रुट लाडू (Methi Dryfruit Laddu)

मेथी-ड्रायफ्रुट लाडू (Methi Dryfruit Laddu)

मेथी-ड्रायफ्रुट लाडू

साहित्य : 1 वाटी मेथीची पूड, 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं, 1 वाटी खारकेची पूड, 1 वाटी डिंकाची पूड, 2 वाटी किसलेला गूळ, पाव वाटी काजूची पूड, पाव वाटी बदामाची पूड, 1 वाटी भाजलेलं गव्हाचं पीठ, आवश्यकतेनुसार तूप.

कृती : एक वाटी तुपात मेथीची पूड दोन दिवस भिजत ठेवा. दोन दिवसांनंतर ती मंद आचेवर परतवून घ्या. नंतर त्यात सुकं खोबरं, खारकेची पूड, डिंकाची
पूड, काजूची पूड, बदामाची पूड आणि गव्हाचं पीठ घालून चांगलं परतवा. गुळाचा दोन तारी पाक तयार करून घ्या. मेथीचं मिश्रण परतवल्यावर त्यात गुळाचा पाक एकत्र करा आणि आच बंद करा. मिश्रण सोसवेल इतपत गरम असतानाच तुपाच्या हाताने लहान लाडू वळा.