मेथीची उसळ (Methi Curry)

मेथीची उसळ (Methi Curry)

मेथीची उसळ

साहित्य : 1 कप मोड आलेले मेथी दाणे, दीड कप गव्हाचं रवाळ पीठ, पाव कप ओलं खोबरं, 8 लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट, स्वादानुसार लाल मिरची पूड, मीठ आणि साखर, फोडणीसाठी मोहरी, हिंग आणि हळद.

कृती : कढईत तेल गरम करून, त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद आणि लसणाची पेस्ट घालून परतवा. नंतर त्यात मोड आलेले मेथी दाणे घाला. हलकेच परतून कमी पाण्यात झाकण लावून शिजवा. मेथी शिजून चांगली वाफ आल्यावर त्यात लाल मिरची पूड, मीठ आणि साखर घालून परतवा. मेथी शिजत आल्यावर त्यात जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ आवश्यकतेनुसार घाला. नंतर पाणी घालून उसळ शिजवून घ्या. उसळ चांगली एकजीव झाल्यानंतर त्यावर ओलं खोबरं घाला आणि गरमागरम मेथीची उसळ पोळी किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.
टीप :
1 कप मेथीचे दाणे धुऊन दुप्पट पाण्यात 10-12 तास भिजत ठेवा. नंतर सुती कापडात बांधून मोड येण्यासाठी ठेवून द्या. साधारण एक-दीड दिवसात चांगलेच मोड येतात.
उसळ परतवताना मेथी दाण्यांचे मोड तुटणार नाही याची काळजी घ्या.