मावा कोकोनट जॅम रोल (Mava Coconut Jam Roll)

मावा कोकोनट जॅम रोल (Mava Coconut Jam Roll)

मावा कोकोनट जॅम रोल

साहित्य : अर्धा कप मिक्स फ्रुट जॅम, 1 कप मावा, अर्धा कप खोबर्‍याचा कीस, 1 टेबलस्पून पिठीसाखर, 1 टेबलस्पून काजू पावडर, 1 टेबलस्पून खसखस.

कृती : प्रथम एका कढईमध्ये मावा पाच ते दहा मिनिटं चांगला परतून घ्या. नंतर पूर्णपणे थंड होऊ द्या. आता चांगला मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे करा. एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटा. नंतर त्यावर जॅम लावा. आणि तसेच फ्रीजमध्ये दहा मिनिटांसाठी ठेवा. तोपर्यंत एका भांड्यात खोबर्‍याचा कीस, पिठीसाखर, काजू पावडर, खसखस एकत्र करून घ्या. नंतर जॅम लावलेली पोळी बाहेर काढा आणि त्यावर हे मिश्रण घाला आणि हलक्या हाताने त्याचा रोल बनवा. आता पुन्हा 10 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजमधून बाहेर काढून एक
इंच आकाराचे रोल कापा. मुलांना डब्यात आणि गणपतीला प्रसाद म्हणून द्यायला ही पाककृती नवीन आहे.