मस्तानी कढी (Mastani Kadhi)

मस्तानी कढी (Mastani Kadhi)

मस्तानी कढी, (Mastani Kadhi)

मस्तानी कढी, Mastani Kadhi

साहित्य : 1 वाटी हापूस आंब्याच्या मध्यम आकाराच्या फोडी, 1 वाटी डाळिंबाचे दाणे, 5 वाट्या नारळाचं घट्ट दूध, अर्धा वाटी मलई, अर्धा वाटी टुटीफ्रुटी, 5-6 मिरच्या, 1 इंच आलं, 5 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, फोडणीचं साहित्य.
कृती : नारळाचं दूध, मलई आणि बेसन चांगलं घुसळून उकळण्यासाठी ठेवा. मिरच्या, आलं आणि लसणाचं बारीक वाटण करून घ्या. एका लहानशा कढईत तुपाची फोडणी करा. त्यात वाटण आणि जिरं तडतडवून घ्या. ही फोडणी गरम असतानाच कढीत ओता आणि गॅस बंद करा. त्यात मीठ, आंब्याच्या फोडी, डाळिंबाचे दाणे आणि टुटीफ्रुटी घाला. ही कढी थोडा वेळ झाकून ठेवा आणि मग सर्व्ह करा.

डाळिंबी उसळ (Special Maharashtrian Curry)