मँगो योगर्ट, हलवा आणि खीर (Mango Yogart, Halwa ...

मँगो योगर्ट, हलवा आणि खीर (Mango Yogart, Halwa And Kheer)

मँगो योगर्ट

साहित्य : 2 कप पिकलेल्या आंब्याच्या फोडी, पाऊण कप दही, दीड टेबलस्पून मध.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडर किंवा मिक्सरमधून एकजीव करून घ्या. दाटपणा कमी करण्यासाठी थोडे पाणी घालू शकता. फ्रिजमध्ये ठेवून थंड करा आणि गारेगार डेझर्ट मनमुराद खा.

मँगो हलवा


साहित्य : 3 कप आंब्याच्या फोडी, 2 कप साखर, 1 टेबलस्पून वेलची पावडर, 1 टेबलस्पून तूप, सजावटीसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप.
कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये आंब्याच्या फोडी आणि साखर घालून मंद गॅसवर ठेवा. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. त्यानंतर वेलची पावडर घालून व्यवस्थित एकत्र करा.
ताटाला तूप लावून त्यावर तयार झालेले मिश्रण जाडसर पसरा. आवडीनुसार त्यावर बदाम किंवा पिस्त्याच्या कापांची सजावट करा. मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. स्वादिष्ट मँगो हलवा तयार आहे.

मँगो खीर


साहित्य : 1 कप सायीसकट दूध, पाव कप तांदूळ, 1 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून तूप, 4-5 कांड्या केशर, 1 टीस्पून वेलची पावडर, 1 कप आंब्याचा रस, 4-5 बदाम व पिस्ते काप करून.
कृती : तांदूळ धुऊन 20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा. नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. पॅनमध्ये दूध उकळवा. त्यात तांदळाची पेस्ट घालून चांगली शिजवून घ्या. नंतर आंब्याचा रस त्यात घाला. साखर, वेलची पूड आणि केशराच्या काड्या घालून ढवळा. पाच मिनिटं शिजल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर बदाम-पिस्त्यांनी सजावट करून खीर सर्व्ह करा.