मँगो ट्रीट : मँगो फालूदा कस्टर्ड (Mango Treat :...

मँगो ट्रीट : मँगो फालूदा कस्टर्ड (Mango Treat : Mango Falooda Custard)

मौसमी फळं खाणं केव्हाही चांगलंच असतं. सध्या आंब्याचा मौसम आहे. सगळ्यांचं आवडतं फळ म्हटल्यावर आपण त्याच्या वेगवेगळ्या पाककृती करून पाहतो, परंतु तुम्ही मँगो फालूदा कस्टर्ड खाल्लं आहे का, नाही तर मग लगेच किचनमध्ये जा आणि तयारीला लागा. अतिशय स्वादिष्ट अशी ही पाककृती अगदी थोड्या वेळात बनते.


मँगो फालूदा कस्टर्ड
साहित्य : अर्धा किलो पिकलेल्या आंब्याचा गर, अर्धा लीटर दूध, चवीनूसार साखर, ६० ग्रॅम कस्टर्ड पावडर (व्हॅनिला फ्लेवर), १०० ग्रॅम फ्रेश क्रीम, स्वादानुसार फालूदा
कृती : आंब्याचे छोटे-छोटे तुकडे कापून त्याचा गर वेगळा करून घ्या. नंतर दूध उकळवून घ्या. १ टेबलस्पून थंड दूधामध्ये कस्टर्ड पावडर मिसळून उकळत असलेल्या दूधात घाला. कस्टर्ड पावडर दूधामध्ये चांगली एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. नंतर त्यात साखर घालून आचेवरून खाली उतरवा. कस्टर्ड थंड झाल्यावर त्यात आंब्याचा गर आणि क्रीम मिसळा. हे मिश्रण थंड होण्याकरता फ्रिजमध्ये ठेवा. फालूदा घालून सजवा आणि सर्व्ह करा.