मँगो ट्रीट : क्रंची मँगो पार्फे (Mango Treat : ...

मँगो ट्रीट : क्रंची मँगो पार्फे (Mango Treat : Crunchy Mango Parfait)

आंबा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांच्याच आवडीचं फळ आहे. आंब्याचे अनेक पदार्थ करता येतात. अशा वेगवेगळ्या पाककृतीच्या निमित्ताने आंब्याची वेगवेगळी चव चाखता येते. क्रंची मँगो पार्फे ही देखील अशीच एक स्वादिष्ट आणि बनवण्यास सोपी पाककृती आहे.

 

क्रंची मँगो पार्फे

साहित्य : २ आंब्यांचा रस

अर्धा कप घट्ट दही

२ टेबलस्पून बदाम (परतून बारीक काप करुन घेतलेले)

पाव टीस्पून व्हॅनिला इसेंस

५-६ टेबलस्पून मुसली

 

कृती : एका बाऊलमध्ये दही, आंब्याचा गर, व्हॅनिला इसेंस एकत्र करा.

एका ग्लासमध्ये १ टेबलस्पून मुसली आणि भाजलेले बदाम घालून दही व आंब्याचे मिश्रण घाला.

ही क्रिया पुन्हा करा. वरून बदामाचे काप घालून सजावट करा नि सर्व्ह करा.