मँगो ट्रीट : आंबा पाक (Mango Treat : Aamba Pak)

मँगो ट्रीट : आंबा पाक (Mango Treat : Aamba Pak)

आंबा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांच्याच आवडीचं फळ आहे. आंबा नुसताच खाण्यापेक्षा त्याच्या वेगवेगळ्या पाककृती करून खाल्ल्यांनतर त्याची चव वर्षभर जिभेवर रेंगाळत राहणार, हे निश्चित. आज आंबा पाक चाखून बघा.

आंबा पाक

साहित्य :

५०० ग्रॅम मावा

२५० ग्रॅम साखर

१ टेबलस्पून घी

१ टीस्पून वेलची पावडर

६-७ आंब्यांचा रस

चिमूटभर पिवळा फूड कलर

थोडे पिस्ता-बदाम

कृती –

साखरेत आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची तीन तारेची चाशनी बनवून वेगळी ठेवा.

कढईमध्ये मावा परतून घ्या.

माव्याला तूप सुटू लागलं की, त्यात आमरस आणि फुड कलर घालून थोडं परतून घ्या.

त्यात चाशनी घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्या.

आचेवरून खाली उतरवून तेल लावलेल्या थाळीमध्ये तयार मिश्रण पसरवा.

थंड झाल्यावर बदाम-पिस्त्याने सजवा.

आपल्या आवडीच्या आकारात कापा आणि सर्व्ह करा.