मँगो रसमलाई (Mango Rasmalai)

मँगो रसमलाई (Mango Rasmalai)

मँगो रसमलाई

साहित्य –  1 लीटर दूध, 100 ग्रॅम चक्का, 50 ग्रॅम साखर, अर्धा ग्रॅम केशर,
1 हापूस आंबा, 1 ग्रॅम वेलची पूड.
कृती – एका नॉनस्टिक पॅनमध्ये दूध गरम करत ठेवा. दुधाला उकळी आली की,
त्यात साखर, आंब्याचा रस, केशर आणि वेलची पूड एकत्र करा. दहा मिनिटं किंवा
दूध आटून पाऊण होईपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहा. आता हे मिश्रण आचेवरून खाली उतरवून बाजूला ठेवून द्या.
आता चक्क्याचे लहान लहान गोळे करून, त्यांना थोडा दाब देत, पेढ्यांचा आकार द्या.
एक जाड बुडाच्या भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र उकळवत ठेवा. त्यात चक्क्याचे गोळे सोडून, ते शिजवून घ्या. शिजल्यानंतर आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. चक्क्याच्या गोळ्यांवर हलका दाब देऊन त्यातील अतिरिक्त साखरेचं पाणी
काढून घ्या.
आता सर्व्हिंग बाऊलमध्ये सर्वप्रथम चक्क्याचे गोळे लावा. त्यावर दुधाचं मिश्रण घाला. हे किमान दोन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. त्यावर सुकामेव्याचे काप घालून सर्व्ह करा.